महात्मा फुले महामंडळाच्या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : महात्मा फुले विकास महामंडळामार्फत विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अनुसूचित जातीतील लाभार्थ्यांनी प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सन २०२३-२४ साठी देण्यात येणाऱ्या प्रशिणासाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील महार, नवबौध्द, खाटीक, डुमार, मेहतर भंगी समाजाचा असावा. त्यांचे वय १८ ते ३५ वर्ष असावे. विहित नमुन्यातील अर्ज महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या कार्यालयात उपलब्ध आहे, असे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.
News - Wardha