ई.कोर्ट प्रणालीमुळे न्यायालयीन कामे गतीशील झाले- वि.प्र पाटकर


- कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न
विदर्भ न्यूज  एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : 
ई. कोर्ट प्रणालीमुळे न्यायालयीन काम गतिशील झाले असुन  कार्यामध्ये सुलभता आलेली आहे. याचा प्रत्यक्ष  लाभ पक्षकार तसेच अधिवक्ता यांना झालेला आहे.  ई.कोर्ट प्रणालीमुळे प्रकरणांचा तपशील  तसेच कामकाज संगणकावर  व मोबाईलवर पाहता येते त्यामुळे  आपल्या प्ररकणांची माहिती  पक्षकार  तसेच अधिवक्ता यांना घरबसल्या  सहज  प्राप्त होत आहे. यामुळे वेळ व पैशाची बचत होण्यास मदत होत आहे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश वि.प्र पाटकर यांनी  कायदेविषय मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन प्रसंगी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या वतीने एक दिवशीय  न्यायिक अधिकारी, शासकिय अभियोक्ता व अधिवक्ता यांचे साठी ई.कोर्ट प्रणालीए नालसा वेब पोर्टल  या विषयावर  न्यायालयीन जुने  प्रलंबित  दावे शिघ्रगतीने काढण्यासाठी  न्याय सेवा सदन येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव  निशांत परमा, जिल्हा शासकिय अभियोक्ता  जी. व्ही .तकवाले  अधिवक्ता संघाचे अध्यक्ष  पी.एम देशपांडे उपस्थित होते. 
ई.कोर्ट प्रणालीमुळे  न्यायालयातील प्रलंबित प्रकरणाची वर्गवारीनिहाय माहिती  सहज उपलब्ध होते. न्यायव्यवस्थेमध्ये आलेल्या गतीशिलतेमुळे  कामे पारदर्शक झाली आहे. पक्षकारांनी व अधिवक्तांनी या प्रणालीचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी श्री पाटकर यांनी केले.
विधी सेवा प्राधिकरणच्या विविध योजनांची माहिती  तसेच उपक्रमांच्या माहिती करीता नालसा वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण  मुबंई यांचे व्दारा विकसीत केल्या गेलेल्या नॅशनल ज्युडीशीयन डाटा ग्रीड या संकेतस्थळाची  माहिती देऊन संकेत स्थळाचा लाभ घेण्याचे आवाहन  श्री परमा यांनी केले.  
शिबिराला सर्व न्यायाधिश,शासकिय अभियोक्ता, अधिवक्ता  मोठया संख्येन उपस्थित होते 

   Print


News - Wardha | Posted : 2019-03-07


Related Photos