निवडणूक आयोगाच्या विशेष मोहिमेत ४०९५ मतदारांचे अर्ज


विदर्भ  न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : 
ऐनवेळी मतदान यादीत नाव नाही  म्हणून होणारा गोंधळ टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने वेळोवेळी मतदान यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी विशेष  कार्यक्रम राबविले. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत जिल्ह्यातील ४०९५  मतदारांनी अर्ज केले आहेत.   यामध्ये यादीत नाव समाविष्ट करण्यासोबतच नाव वगळणे, नाव स्थानांतरित करणे, यादीतील नावात दुरुस्ती करणे अशा बाबींसाठी मतदारांनी अर्ज केले आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. यासाठी मागील दोन वर्षांपासून निवडणूक आयोगाने विशेष पुनरूरीक्षण  कार्यक्रम राबवून मतदारांची नोंदणी केली आहे. तसेच मतदान केंद्र अधिकारी यांच्या माध्यमातून घरोघरी मतदारांची नोंदणी करण्याचा  कार्यक्रमही राबविण्यात आला.  निवडणूक आयोगाने ३१ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली.  ही मतदार यादी सर्व मतदान केंद्रावर प्रसिद्ध करून त्यावर आक्षेप व हरकती मागविण्यात आल्या.  तसेच यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी निवडणूक आयोगाने २३ आणि २४ फेब्रुवारी आणि २ व ३ मार्च रोजी विशेष पुन:निरीक्षण कार्यक्रम राबवून  मतदार यादीत नाव नोंदण्याची अंतिम संधी मतदारांना उपलब्ध करून दिली . याला जिल्ह्यातील एकूण ४  हजार ९५  मतदारांनी प्रतिसाद दिला आहे.
यामध्ये ३ हजार ४६७ मतदारांनी नव्याने नाव समाविष्ट करण्यासाठी  ६ क्रमांकाचा अर्ज भरून दिला आहे. तर ४०४ मतदारांनी त्यांचे नाव एका मतदार संघातून दुसऱ्या मतदार संघात स्थानांतर करण्यासाठी अर्ज केला आहे. १५९  मतदारांनी मतदार यादीतून नाव वगळण्याची तर ६५  मतदारांनी नावाच्या दुरुस्ती साठी अर्ज केला आहे.
२ व ३ मार्च रोजी १८ वर्ष पूर्ण झालेल्या नवीन मतदारांसाठी नोंदणी करण्याचा विशेष कार्यक्रम राबविण्यात आला होता. यामध्ये १ हजार ४१८ मतदारांनी मतदार यादीत  नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज दिला आहे . या मोहिमेत प्राप्त झालेल्या सर्व अर्जांचा समावेश वा वगळण्याची करण्याची प्रक्रिया सुरू आहे.    Print


News - Wardha | Posted : 2019-03-07


Related Photos