पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वीतेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे - जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे


-१०मार्चला पोलिओ लसीकरण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी/ गोंदिया : 
देशाची भावी पिढी असलेल्या पाच वर्षाच्या आतील जिल्ह्यातील सर्व बालकांचे पोलिओ लसीकरण करावे. जिल्ह्यातील कोणताही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.  तसेच या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले. 
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात १ मार्चला पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने आयोजित जिल्हा टास्कफोर्स समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. जि. प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ .अमरीश मोहबे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) तुषार पवनीकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ एम.बी.राऊत  यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. 
रविवारी १० मार्च २०१९ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे प्राप्त कृती आराखड्यानुसार एकूण लोकसंख्या १३७९३५० असून ० ते ५ वर्ष बालकांचे १,०४,388 चे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.  ग्रामीण भागातील ८३७५४ तर शहरी भागातील २०६३४ बालकांची नोंद करण्यात आलेली आहे.  या मोहिमेमध्ये बायव्हायलंट लसीचा वापर करण्यात येणार आहे.
एकूण १४०१ बुथचे नियोजन करण्यात आले असून ग्रामीण भागातील १२६८ तर शहरी भागातील १३३ आहेत.एकूण मनुष्यबळ ३१८१लागणार असून ग्रामीण भागात २८५३ तर शहरी भागात ३२८ आहेत.  एकूण २८२ पर्यवेक्षक असून ग्रामीण भागातील २५५ तर शहरी भागातील २७ पर्यवेक्षक आहेत.
बूथवरील लसीकरणानंतर ग्रामीण भागात ३ दिवस व शहरी भागात ५ दिवस घरभेटीद्वारे सुटलेल्या लाभार्थ्यांना डोस पाजण्यात येणार आहे. एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही अशा दृष्टीने कृतीनियोजन करण्यात आले आहे. एकूण राहती घरे २,9४,५७४ असून ग्रामीण भागातील २,५३,३५९ व शहरी भागातील ४१,२१५ आहेत. 
जिल्ह्यातील कोणताही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी प्रत्येक गावातए टोले, वाडे, शाळेत, अंगणवाडी, बसस्थानक, रेल्वे स्टेशन इत्यादी ठिकाणी बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
सभेत नागपूर विभागाचे पोलिओ सर्वेक्षण अधिकारी डॉ. मोहम्मद साजिद, जिल्हा माताबालसंगोपन अधिकारी डॉ.अनंत चांदेकर यांनी मार्गदर्शन केले.  राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या जिल्हा टास्कफोर्स समितीच्या सभेला सर्व तालुका आरोग्य अधिकारीए सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार आरोग्य सहायक ए.एस.वंजारी यांनी मानले.      Print


News - Gondia | Posted : 2019-03-07


Related Photos