जागतिक महिला दिनानिमित्य भंडारा येथे महिला मेळावा


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
 प्रतिनिधी / भंडारा :
जागतिक महिला दिना निमित्त ८ मार्च रोजी दुपारी  १ वाजता राणा भवन, भंडारा येथे भारतीय महिला फेडरेशनच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे .
मेळाव्यात विविध समस्या आणि मागण्या संबधी चर्चा , समस्या ऐकण्यात येतील, मते मांडण्याची संधी दिली जाईल, आणि मार्गदर्शन केले जाईल. महिला मेळाव्यात माजी नगर सेवक व  भाकपचे जिल्हाध्यक्ष हिवराज उके, भारतीय महिला फेडरेशनच्या जिल्हा अध्यक्ष शांताबाई बावनकर, महिला कार्यकर्त्या प्रियकला मेश्राम, गजानन पाचे, जलप्रेमी माधुरी देशकर आदी उपस्थित राहतील. 
तेव्हा महिला मेळाव्यात सर्व स्तरातील महिलानीं व  मुलींनी तसेच नागरिक व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन महिला फेडरेशनच्या  उपाध्यक्ष रत्नाबाई इलमे, जिल्हा सचिव अंजीर उके, प्राची चटप,महानंदा गजभिये, सरस्वत देशमुख, श्रीवंता अंबुले, छब्बी पाचे, सारतीक भोयर, लीलाबाई रामटेके,  आशा गजभिये, मंदा डोकरीमारे, भारती मेश्राम, कल्पना रहाटे, विजया काळे इत्यादींनी केले आहे. 

   Print


News - Bhandara | Posted : 2019-03-07


Related Photos