गोंदियात जागतीक महिला दिना निमित्य भव्य मोटार सायकल रॅली चे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी/ गोंदिया :
जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया, जिल्हा परिषद गोंदिया, महिला आर्थिक विकास महामंडळ ( माविम ) गोंदिया आणि  विविध शासकीय विभाग व महिला सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतीक महिला दिनानिमित्य  ८ मार्च ला भव्य मोटार सायकल रॅली चे आयोजन करण्यात आलेले आहे . 
या रॅली मध्ये १५० महिला मोटार सायकल सह सहभागी होणार असुन महिला सशक्तीकरण सुरक्षितता, मतदान जागृती व प्लास्टिक बंदी या संदेशाने रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे . रॅलीचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजा दयानिधी,  पोलीस अधीक्षक विनिता शाहू  यांच्या प्रमुख उपस्थितीत मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे .सदर मोटार सायकल रॅली सकाळी ०८. ३० वा पासुन ११ वा पर्यंत नेहरू चौक पासुन सुरुवात होऊन मामा चौक गोविंदपूर दुर्गा चौक, मनोहर चौक, जयस्तंभ चौक, गांधी प्रतिमा, गोरेलाल चौक, नेहरू चौक येथे समाप्त होणार आहे. 

   Print


News - Gondia | Posted : 2019-03-07


Related Photos