भंडारा येथे अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा तालुका स्तरीय मेळावा संपन्न


आपल्या हक्कासाठी आयटक  मजबूत करा : हिवराज उके
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा :
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक ) तालुका शाखा भंडारा तर्फे ६ मार्च रोजी स्थानिक राणा भवन येथे मंगला गजभिये यांच्या अध्यक्षतेखाली अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला . 
मेळाव्याचे उदघाटक आयटक जिल्हा सचिव हिवराज उके यांनी आपल्या हक्कासाठी आयटक अंगणवाडी कर्मचारी युनियन मजबुत करा, असे आवाहन करीत  आपल्या प्रश्नां बरोबर इतरांच्या प्रश्नांसाठी सहभागी होणे गरजेचे आहे. येणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष  दिलीप उटाणे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न वा शासनाची भुमिका स्पष्ट करीत केंद्र व राज्य सरकारने दिलेले आश्वासन पाळले नाही . पंतप्रधान यांनी ११ सप्टेंबर २०१८ रोजी अंगणवाडी सेविका १५००/-, मिनी अंगणवाडी सेविका १२५०/- व मदतनिस ७५०/- रुपये माननवाढ १ ऑक्टोबरला जाहीर केले. परंतु अजून पर्यत दिली नाही .यावर सविस्तर मार्गदर्शन उटाणे यांनी केले.
या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष सविता लुटे, कुंदा भदाडे ,छाया,क्षिरसागर,,दुर्गा लोहबरे,,छाया गजभिये, विद्या गणविर, उषा रणदिवे,,मजुषा गणवीर यांनी आपले विचार व्यक्त केले .
दरम्यान तिन वर्षा पासून अंगणवाडी केंद्राला लागणारी स्टेशनरी दिली नाही. शासनाकडून  २०१८ ची शादिल खर्च निधी नोव्हेंबर मध्येच येवून सुध्दा दिला गेला नाही. आयजिएमएसवाय चे पैसे देण्यात आले नाही.  थकीत प्रवास भत्ता देण्यात आला नाही. इत्यादी स्थानिक प्रश्नावर चर्चा करण्यात आली. तसेच एक वर्षासाठी तालुका कार्यकारणीची निवड सर्वानुमते करण्यात आली . यामध्ये अध्यक्ष मंगला गजभिये , कार्याध्यक्ष - दुर्गा लोहबरे, उपाध्यक्ष - कुंदा भदाडे .छाया गजभिये. सचिव छाया क्षिरसागर .सहचिव -मनिषा शेंडे .मंगला पंचभाई .कोषाध्यक्ष --शोभा ताईतकर .सहकोषाध्यक्ष मिना मडावी.संघटक - निता चोपकर, संघटन सचिव शर्मिला भोयर, किरण मस्के,  सदस्य - रेखा बाभरे,,शशीकला राउत, गिता सरादे,सुलोचना चव्हाण यांची निवड  करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन जयनंदा यांनी केले तर आभार आराती सार्वे यांनी मानले . यावेळी मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते . 
 

   Print


News - Bhandara | Posted : 2019-03-07


Related Photos