असंघटित क्षेत्रातील कामगारांना आता मिळणार पेंशन


-६० वर्षानंतर ३ हजार रूपये प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना केंद्र शासनामार्फत लागू
विदर्भ न्यूज  एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया :
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना केंद्र शासनामार्फत १५ फेब्रुवारी २०१९ रोजी लागू झाली आहे. या योजनेचा लाभ सर्वाधिक ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळावा, हा यामागचा हेतु आहे. त्यामुळे आता असंघटित क्षेत्रातील कामगारांना पेंशनचा लाभ मिळू शकेल.
असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ही महत्वपूर्ण पेन्शन योजना आहे. यात त्या कामगारांना वय वर्षे ६० नंतर प्रति महिना ३ हजार रूपये पेन्शन मिळणार आहे. योजनेत घरगुती व्यवसाय करणारे, रस्त्यावर दुकान लावणारे दुकानदार, ड्रायवर, प्लंबर, शिंपी, गिरणी कामगार, रिक्शा चालक, बांधकाम कामगार, कचरा जमा करणारे,बिळी कामगार, शेती कामगार, मोची,धोबी,मनरेगा मध्ये काम करणारे कामगार, भूमिहिन मजूर इत्यादी असंघटित क्षेत्रातील वर्गांचा समावेश आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे वय १८ ते ४० वर्षे दरम्यान असावे. वयानुसार मासिक हप्ता कमीत कमी ५५ रूपये तर जास्तीत जास्त २०० रूपये आहे. विषेश म्हणजे यात लाभार्थी वयोमानाप्रमाणे मासिक हप्त्याची जेवढी रक्कम जमा करणार तेवढीच रक्कम शासनामार्फत दरमहा जमा केली जाईल. लाभार्थीच्या मृत्यूनंतर पती पत्नीला ५० टक्के पेन्शन रक्कम अदा करण्यात येईल.
योजनेच्या नोंदनीकरण लाभार्थी यांनी गावाजवळील सी. एस.सी केंद्रामध्ये किंवा आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन करणे गरजेचे आहे. केंद्र चालकाव्दारे ऑनलाईन वर माहिती भरण्यात येईल. यासाठी आधार कार्ड, बॅंक खाते पासबूक, पास पोर्ट फोटो व आधारला जोडलेले मोबाईल नंबर आवश्यक आहेत. पहिल्या फी पावती व एम्प्लाॅयमेंट कार्ड त्यांना भेटणार आहे. लाभार्थ्यांचे  मासिक वेतन १५०००/- रु पेक्षा जास्त नसावे,  इपीसी आयपीपी मध्ये नसावी. 
   Print


News - Gondia | Posted : 2019-03-07


Related Photos