महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर परिमंडळात १२ लाख ९४ हजार ९७ ग्राहकांनी जानेवारी २०२३ ते जून २०२३ पर्यंत सुमारे २४ कोटी १५ लाख ९१ हजार भरले एका क्लिकवर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर परिमंडळात एकंदरीत १२ लाख ९४ हजार ९७ ग्राहकांनी जानेवारी २०२३ ते जून २०२३ पर्यंत सुमारे २४ कोटी १५ लाख ९ हजार एका क्लिकवर जागच्या जागी लाईनीत न लागता किंवा घराबाहेर न पडता आपले वीज बिल भरण्यासाठी  महावितरण ॲप व ऑनलाईन पध्दतीचा वापर केला आहे. २ कोटी २७ लाख रुपये प्रति महिना सरासरीने चंद्रपूर जिल्हयातील एकूण ७ लाख ३६ हजार ४६५ ग्राहकांनी या सहा महिण्यात १३ कोटी ६५ लाख तर गडचिरोली जिल्हयातील एकूण ५ लाख ९५७ हजार ३४६ ग्राहकांनी १ कोटी ७५ लाख रुपये प्रति महिना सरासरीने १० कोटी ५० लाख ३८ हजाराचे वीजबिल ॲप व ऑनलाईन वापर करीत सहा महिण्यात भरले आहे. 

अनेक सुविधांचे महावितरण ॲप -

राज्यातील ग्राहकांना तत्पर व ऑनलाईन सेवा मिळावी यासाठी वीजग्राहक व कर्मचाऱ्यांकरिता महावितरणच्या वतीने तयार करण्यात आलेल्या मोबाईल ॲप्सला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत महावितरणच्या तब्बल ५० लक्ष ग्राहकांनी  ग्राहकांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे. हे ॲप ईंग्रजी व मराठीतुन वापरता येते. चंद्रपूर परिमंडळात गेल्या सहा महिण्यात ८ हजार ४७० ग्राहकांनी ॲपचा वापर करुन रिंडींग पाठविले आहे व अचूक बिल मिळण्यास मदत झाली आहे.

या ॲपद्वारे नवीन ग्राहकांना वीजजोडणी अर्ज, नवीन ग्राहक क्रमांक जोडण्याची किंवा काढण्याची सुविधा, गो-ग्रीन म्हणजे ई मेलवर वीजबिल प्राप्त करण्याची सुविधा मिळविणे, ग्राहकसेवा केंद्र व जवळचे कार्यालयाची तसेच वीजबिल भरणा केंद्राची माहिती, नवीन जोडणी साठी अर्ज करणे व सध्याची अर्जााची स्थिती जाणून घेणे. नाव बदल्ण्याची मागणी, वीजजोडभार बदलण्याची मागणी, पुर्णजोडणी शुल्क भरण्याची सुविधा, उपयुक्त संकेतस्थळाचे दुवे, वीजदेयक भरणा करण्याची सुविधा, वीजदेयक व वीजदेयक भरणा केल्यासंबंधी तत्सम पुर्व माहिती, याशिवाय ज्या ग्राहकांचे मीटर रीडिंग घेण्यात आले नाही त्यांना ॲपद्वारे मीटर रिडींग पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, कृषि वीज योजना २०२० नुसार कृषिपंपाची थकबाकी पाहण्याची सुविधा, वीजबिलासंबंधी तसेच वीजपुरवठा ख्ंडीत झाल्या संबंधी तक्रारी नोंदविण्याची सुविधा, वीजग्राहकांना ज्या वीजवाहिणीवरुन वीजपुरवठा होतो. त्या वीजवाहिणीची माहिती, नादुरुस्त्‍ रोहि­­त्रासंबधी महिती नोंदविणे, वीजचोरीची माहिती कळविणे, संपर्काची माहिती अदययावत करणे तसेच अभिप्राय कळवणे. इत्यादी सेवा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. हे ॲप महावितरण वेबसाईट, गुगलप्ले, ॲपल, विंडोज प्ले स्टोअर्स येथे उपलब्ध आहे. या ॲपचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांनी केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos