महत्वाच्या बातम्या

 भिवापूर प्रभागात नवीन श्रीराम मंदिराची स्थापना पूर्ण


- भिवापूर प्रभागात मोठ्या संख्येत हजर झाले हिंदू भक्तगण 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : भिवापूर वॉर्ड, चंद्रपूर येथे नवीन श्री राम मंदिराची स्थापना करण्यात आली. २० जून रोजी सकाळी मंदिर परिसरात भाविकांकडून भजन कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला व सायंकाळी श्री महाकाली मंदिरापासून श्रीरामांच्या नवीन मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भिवापूर प्रभागातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. तसेच या मिरवणुकीत महिला व युवा वर्गाने मोठ्या संख्येत सहभागी झाले. 

ही मिरवणूक श्री महाकाली मातेच्या मंदिरापासून सुरू होऊन संपूर्ण भिवापूर वार्डातून मार्गक्रमण करीत, मिरवणुकीचा समारोप गंतव्यस्थानी म्हणजेच श्रीराम मंदिरात संपन्न झाला. या मिरवणुकीचे विशेष आकर्षण बाळ राम, सीता,लक्ष्मण,उर्मिला,हनुमान यांचे स्वागत रथ हे होते. या स्वागत रथावर संपूर्ण बाळ राम दरबार विराजमान झाले होते. नवीन मंदिरात स्थापित होणाऱ्या नवीनतम श्रीराम दरबार व इतर देवी देवतांच्या नवीन मूर्तींचे भगवे ध्वज, भजन कीर्तन, बँडबाजे सह धूमधडाक्यात प्रभागातील भाविकांनी स्वागत केले. रात्री श्री मुरलीजी व्यास यांच्या सुरेख वाणीत उपस्थित सर्व भाविकांना राम कथा संबोधित करण्यात आली व उपस्थित वादकांनी पूर्ण भक्तीने जे भजन कीर्तन व मंगलगीत गाईले त्यामुळे मंदिर परिसरात उपस्थित सर्व भाविक मंत्रमुग्ध झाले. 

२१ जून रोजी सकाळी श्रीराम मंदिरात श्रीराम दरबाराच्या नवीन मूर्तींची प्रतिष्ठापना व अभिषेक झाल्यानंतर सायंकाळी मंदिर परिसरात भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये भिवापूर प्रभागातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. मंदिरात होणार्‍या या दोन दिवसीय कार्यक्रमात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, विविध भजन मंडळे, इतर हिंदू संघटन आणि चंद्रपूरातील नागरिकांनी सहकार्य केले. मंदिरातील मूर्तींमध्ये विश्व हिंदू परिषदेचे विशेष सहकार्य होते. या नवीन मंदिराच्या जागेवर पूर्वी श्री हनुमानांचे मंदिर होते. 

सन २०१० मध्ये भिवापूर वॉर्डातील नागरिकांनी पहिल्यांदा या मंदिराची स्थापना केली होती. मात्र काळ अनुसार या मंदिराची परिस्तिथी जीर्ण झाली आणि भिवापूर वार्डातील तरुण नागरिकांनी या मंदिराची जीर्ण अवस्था पाहून संकट मोचन हनुमान मंदिर सेवा समिती या नावाने नवीन संस्थेची नोंदणी करून नवीन मंदिराच्या स्थापनेची जबाबदारी घेतली. आता मंदिराच्या नवीन बांधकामामुळे मंदिराचे सुशोभीकरण झाले आहे. या दोन दिवसीय मंदिर स्थापना कार्यक्रमात चंद्रपुरातील विविध मान्यवर व हिंदू भाविक सहभागी झाले. 

यावेळी चंद्रपूर शहराचे आ. किशोर जोरगेवार, चंद्रपूर जिल्ह्याचे सुप्रसिद्ध भागवताचार्य संत मनीष महाराज, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष रॉडमल गेहलोत, शहराध्यक्ष गोपाल तोष्णीवाल, विश्वास मधमशेट्टीवार, प्रकाश इकोंडकर, राजेश यादव, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश तिवारी, रघुवीर अहिर, श्यामलाल बजाज व चंद्रपूर नगराचे इतर गणमान्य नागरिक उपस्थित होते. मंदिराचे सुशोभीकरण करण्यासाठी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी मंदिराच्या नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. 

सदर कार्यक्रमात विक्की निखारे, सनी धकाते, मनोज मतकुलवार, प्रवीण गड्डमवार, जयंत सरकार, प्रमिल कांबळे, नितीन पाठे, संजय पॉल, हरिष धकाते, रवि कोहाड, राज अटकापुरवार, यश निनावे, विशाल धकाते, महेश मतकुलवार, आशुतोष आस्वले, शुभम निषाद, राजू कुंभारे, घनश्याम भोगेकर, अमोल भिसे यांच्यासह चंद्रपूर येथील अनेक नागरिकांनी मंदिर स्थापने संदर्भातील विविध कार्यक्रमात सहकार्य केले. 

जीर्ण झालेल्या मंदिराचे फार कमी वेळात जीर्णोद्धार करून मंदिराचे सुशोभीकरण केल्याबद्दल भिवापूर प्रभागातील नागरिकांकडून समितीचे कौतुक केले जात आहे. या दोन दिवसीय मंदिराच्या स्थापनेसाठी सगळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून सर्व देणगीदारांचे आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिकांचे आभार व धन्यवाद व्यक्त करण्यात आले.





  Print






News - Chandrapur




Related Photos