संतापजनक! , सख्ख्या भावानेच बहिणीवर केला बलात्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
सख्ख्या भावानेच बहिणीवर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार नागपूरमध्ये समोर आला. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी हुडकेश्वर पोलीस नराधम भावाला ताब्यात घेतले आहे.
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीडित मुलगी आणि तिचा भाऊ राहतो. दोघेही अल्पवयीन आहेत. चार महिन्यांपूर्वी दोघे घरी एकटे होते. नराधम भावाने जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तो सतत तिच्यावर अत्याचार करत होता. काही दिवसांपूर्वी मुलीची प्रकृती खालावली. नातेवाईकांनी तिला सरकारी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत मुलगी गर्भवती असल्याचे उघड झाले. हे ऐकून नातेवाईकांना धक्काच बसला. त्यांनी मुलीची चौकशी केली असता सख्खा भाऊच अत्याचार करत असल्याचे तिने सांगितले. याबाबत  आईने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीही अल्पवयीन असल्याने त्याला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.  Print


News - Nagpur | Posted : 2019-03-07


Related Photos