जम्मूमधील बस स्थानकावर ग्रेनेड हल्ला : २८ जण जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / श्रीनगर :
जम्मूमधील बस स्थानकावरील तिकीट खिडकीच्या दिशेने ग्रेनेड टाकण्यात आला, यानंतर मोठा स्फोट झाला. १२ वाजून १० मिनिटांच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात २८ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  
जम्मूचे आयजीपी एम के सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादी हल्ला होईल अशी शक्यता होती आणि पोलीस त्यादृष्टीने सर्व उपाययोजना करत होते. मात्र कोणतीही ठराविक माहिती देण्यात आलेली नव्हती. याआधीही दहशतवाद्यांनी अनेकदा बस स्थानकावर ग्रेनेड हल्ला करत टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे.
 पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर झालेल्या हा पहिला दहशतवादी हल्ला असून यामध्ये २८ जण जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. स्फोट झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसर सील केला.



  Print






News - World | Posted : 2019-03-07






Related Photos