महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाही येथे शांतता समितीची बैठक संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : येणाऱ्या बकरी ईद व इतर सणासुदीच्या मुहूर्तावर शांतता व सुयवस्था कायम राहावी. याकरीता पोलिस स्टेशन सिंदेवाही येथे २१ जून ला शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली.

यावेळी ब्रम्हपूरी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या अध्यक्षतेखाली व सिंदेवाहीचे ठाणेदार तुषार चव्हाण यांच्या उपस्थित शांतता सभा घेण्यात आली. नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत आणि अभिनंदन करण्यात आले. 

सदर सभेला सिंदेवाही नगरपंचायत नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष रफीक अहमद शेख, सिंदेवाही नगरसेवक यूनुस शेख, शांतता समितीचे सदस्य, राजकीय नेते, पत्रकार, सिंदेवाही येथील व्यापारी, नगरसेवक, उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युनुस शेख नगरसेवक यांनी केले तर आभार रणवीर मदारे यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos