लोकशाही प्रणालीत सशक्त राष्ट्रनिर्मितीसाठी प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक : जिल्हाधिकारी शांतनू गोयल


-वॉक फॉर वोट मॅराथॉन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा :
लोकशाही प्रणालीत सशक्त राष्ट्रनिमितीसाठी प्रत्येक नागरिकांनी सृजनात्मकरित्या मतदान करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शांतनू गोयल यांनी केले.
जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जागृती कार्यक्रमांतर्गत वॉक फॉर वोट मॅराथॉनचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप
तलमले, अप्पर पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर,उपजिल्हाधिकारी निवडणूक विलास ठाकरे, सुभाष भुसारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, तहसिलदार अक्षय पोयाम, नगर परिषद मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणूक पहाता मतदार जागृतीसाठी वॉक फॉर वोट मॅराथानचे आयोजन करण्यात आले आहे. १८ वर्षावरील सर्व मुलामुलींनी आपले नाव मतदार यादीत नोंदवून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 
शहरातील गांधी चौक येथून रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शांतनू गोयल यांनी हिरवी झेंडी दाखवून केला. मतदार जागृतीसाठी आयोजित वॉक फॉर वोट मॅराथान रॅली गांधी चौकातून प्रारंभ होवून छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुल भंडारा येथे सांगता करण्यात
आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार अक्षय पोयाम यांनी केले तर संचलन क्रीडा अधिकारी ए.बी. मरसकोल्हे केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती नाखले, श्रीमती नासरे, तालुका क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल, राज्य क्रीडा मार्गदर्शक भोजराज चौधरी यांनी परिश्रम घेतले. 
सदर मॅराथान रॅली मध्ये प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, युवक, युवती, नेहरु युवा केंद्र व राष्ट्रीय सेवा योजनेचे युवक, विद्यार्थी व नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.



  Print






News - Bhandara | Posted : 2019-03-07






Related Photos