भद्रावती पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक शुभांगी ढगे एसीबीच्या जाळ्यात


- तक्रार मागे घेण्यासाठी स्वीकारली  सात हजारांची लाच  
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
तक्रार मागे घेण्यासाठी सात हजारांची लाच स्वीकारणाऱ्या भद्रावती येथील महिला पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी सायंकाळी रंगेहात अटक केली. शुभांगी गुणवंत ढगे असे आरोपी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
भद्रावती येथील एका प्रकरणाविषयी तक्रार करण्यात आली होती. परंतु आरोपींवर गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्यांनी पोलीस उपनिरीक्षक शुभांगी ढगे यांची भेट घेऊन विचारणा केली. परंतु, आरोपीवर गुन्हा दाखल करणे आणि मोबाईल परत देण्यासाठी सात हजारांची मागणी तक्रारकर्त्याकडे केली.
दरम्यान, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीवरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने सापळा रचला. शासकीय निवासस्थानात पंचासमक्ष शुभांगी गुणवंत ढगे यांना सात हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली.
ही कारवाई नागपूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपायुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक दुद्दलवार, पोलीस उपअधीक्षक विजय माहूरकर, चंद्रपूरचे पोलीस उपअधीक्षक डी. एम. घुगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक पुरूषात्तम चोबे, तसेच महेश मांढरे, संतोष येलपूलवार, रवी ढेंगळे, समीक्षा भोंगळे, राहुल ठाकरे आदींनी केली.  



  Print






News - Chandrapur | Posted : 2019-03-07






Related Photos