चामोर्शी - घोट मार्गावर दोन अपघातात ४ जण गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 प्रतिनिधी / चामोर्शी   :
  शहरातून घोटकडे जाणाऱ्या तसेच चामोर्शी-घोट-आष्टी वळणावर झालेल्या दोन अपघातात ४ जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज ६ मार्च रोजी घडली. 
पहिल्या अपघातात बेलोनो कार  क्रमांक एमएच ३३ व्ही २०२७ ने टि.सी.सरकार हे चामोर्शी येथुन घोटकडे जात होते.दरम्यान एमएच ३३ डी- ६९८३ ने दुचाकीस्वार समोरून येत असतांना खड्डा चुकविण्याच्या नादात त्याने समोरून  येणाऱ्या कारला धडक दिली.या अपघातात दुचाकीवरील नरेश देवराव येरावार,चंदाबाई देवराव येरावार,देवराव कवडू येरावार हे तिघे जखमी झाले.ही घटना सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली.या अपघातामधील जखमींना  प्रथम चामोर्शी येथील ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले. यानंतर  पुढील उपचारासाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. 
दुसरा अपघात दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास  चामोर्शी-घोट-आष्टी वळणावर झाला.दोन दुचाकींनी समोरासमोर धडक दिल्याने एमएच ३४एयु ९४०२ या दुचाकीवरील निखील बाबुराव कुरवटकर याला गडचिरोल येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले आहे.तसेच आष्टी मार्गावरून येणारा वृद्ध दुचाकीस्वार खड्यात  पडल्याने किरकोळ जखमी झाला.त्याला चामोर्शी ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-06


Related Photos