एमएसईबीचा प्रधान तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर :
नविन विद्युत मीटर लावण्याकरीता ४ हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी बेसा बेलतरोडी नागपूर येथील महावितरण कार्यालयातील प्रधान तंत्रज्ञ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.  प्रशांत सेवकराम पुरी (४०) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रधान तंत्रज्ञाचे नाव आहे. 
तक्रारदाराचा खाजगी गाडी दुरूस्तीचा व्यवसाय असून त्यांना   राहत्या  घरी दुसरे नवीन विद्युत मिटर घ्यावयाचे असल्याने त्यांनी बेसा बेलतरोडी, नागपूर येथील एम.एस.ई.बी. कार्यालयात संर्पक केला. प्रधान तंत्रज्ञ  प्रशांत सेवकराम पुरी याच्याशी मोबाईल वर संर्पक साधून तक्रारदाराने नविन विद्युत मिटर घेण्याकरिता लागणाऱ्या कागदपत्राची माहिती प्राप्त केली. तक्रारदाराने  २ मार्च रोजी प्रशांत पुरी याला  मोबाईलवर संर्पक करून आवश्यक  कागदपत्राची पूर्तता केल्याचे सांगीतले. यावेळीर  पुरी याने मी तुमच्या घरी येतो असे कळविले. प्रशांत  पुरी घरी आल्यानंतर तक्रारदराने त्यांना लागणारी कागदपत्रे दाखविली व नविन विद्युत मिटर बसविण्याकरिता किती खर्च येईल अशी विचारणा केली.  पुरी याने ५ हजार रूपये लागतील व पोलपासून घरापर्यत लागणारा केबल हा तुम्हाला आणावे लागेल असे सांगीतले. तक्रारदाराने नविन विद्युत मिटर बसविण्याकरिता ५ हजार रूपये लागत नसल्याबाबत खात्री केली.    पुरी याने तक्रारदारास  ५ हजार रूपये लाचेची मागणी केल्याने   लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर येथे तक्रार नोंदविली. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून सापळा कार्यवाहीचे आयोजन केले असता सदर सापळा कार्यवाही दरम्यान   पुरी याने तक्रारदाराच्या घरी दुसरे नवीन विद्युत मिटर  बसविण्याकरीता 5 हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडअंती ४ हजार रूपये लाच रक्कम स्विकारली. त्यावरून आरोपी विरूध्द  बेलतरोडी, नागपूर शहर पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंध १९८८ (संशोधन) अधिनियम २०१८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अपर पोलीस अधिक्षक  राजेश   दुद्दलवार, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक फाल्गुन घोडमारे,  पोहवा. सुनिल कळंबे, ना.पो.शि. रविकांन्त डहाट, मंगेश कळंबे, नापोशि शिशुपाल वानखेडे सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर यांनी केली आहे.

   Print


News - Nagpur | Posted : 2019-03-06


Related Photos