लोकबिरादरी प्रकल्पात ५६ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकीनी आमटे यांच्या प्रेरणेने आणि डॉ दिगंत आमटे व डॉ. अनघा आमटे या दाम्पत्याच्या पुढाकाराने ५ व ६ मार्च रोजी लोकबिरादरी हॉस्पिटल हेमलकसा येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात ५६ रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आले.
 अवस्थी नेत्रालय सोलापूर व लोकबिरादरी हॉस्पिटल हेमलकसा यांच्या संयुक्त विद्यमाने सदर मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले.फॅको मशिनद्वारे (बिनटाक्याचे) मोतीबिंदू व डोळ्यांचे इतर आजार असलेल्या ५६ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यापूर्वी १८ ते २० जानेवारी  ला पहिले व २३ ते २४ फेब्रुवारी  ला दुसरे तर या वर्षातील हे तीसरे शिबीर होय.
 अवस्थी नेत्रालय सोलापूरच्या डॉ. अनुराधा अवस्थी, डॉ. विरेंद्र अवस्थी यांनी शस्त्रक्रिया केल्या. नवल येमुल,शकुंतला गताटे,मेरी केरुलकर, कल्पना जाधव, रिजवान अरब ( सर्व सोलापूर) आणि संध्या येम्पलवार, जगदीश बुरडकर, शारदा ओक्सा,शारदा भसारकर,गणेश हिवरकर, विनोद बानोत,प्रकाश मायकरकार, अरविंद मडावी (सर्व हेमलकसा)आदींनी मोलाचे सहकार्य केले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-06


Related Photos