राफेल प्रकरणात चोरी केलेल्या कागदपत्रांच्या आधारे बातम्या छापणाऱ्यांवर कारवाई केली जाईल


- महाधिवक्ता के के वेणुगोपाळ यांची माहिती 
वृत्तसंस्था / नवीदिल्ली :
  राफेल प्रकरणात संरक्षण मंत्रालयातून चोरी केलेल्या कागदपत्रांच्या आधारे  बातमी छापणारे दोन इंग्रजी वृत्तपत्र आणि याच आधारे याचिका दाखल करणाऱ्या वकिलांविरोधात ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहिती केंद्र सरकारच्या वतीने महाधिवक्ता के के वेणुगोपाळ यांनी सुप्रीम कोर्टात दिली.
फ्रान्सबरोबर ३६ राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी झालेल्या कराराला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळून लावणाऱ्या १४ डिसेंबरच्या आपल्या आदेशाच्या फेरविचाराची तयारी सुप्रीम कोर्टाने २१ फेब्रुवारी रोजी दर्शवली होती. यासाठी वेगळ्या पीठाची रचना देखील करण्यात आली. बुधवारी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर याचिकांवर सुनावणी झाली.  Print


News - World | Posted : 2019-03-06


Related Photos