महत्वाच्या बातम्या

 आरसेटी गडचिरोली येथे आंतरराष्ट्रीप योगा दिन साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजीत आणि बँक ऑफ इंडिया द्वारा संचालित बँक ऑफ इंडिया गामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था आरसेटी) गडचिरोली येथे २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला .


याप्रसंगी जिल्हा अग्रणी प्रबंधक युवराज टेभूर्णे, आरसेटीचे संचालक कैलाश बोलगमवार, कार्यकम समन्वयक हेमंत मेश्राम आणि पुरुषोत्तम कुनघाडकर, महिला पतंजली च्या जिल्हा योग प्रभारी रजनी दोनाडकर, योग शिक्षिका नयना कोलते व आरसेटी चे सहाय्यक पराग पाटील तसेच मोटार रिवाईंडिंग प्रशिक्षणाचे तज्ज्ञ मार्गदर्शक हंसराज बोपचे आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सर्वप्रथम प्रास्ताविकातून योग साधने बदल प्रशिक्षणार्थी आणि उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर  रजनी दोनाडकर यांनी योगाच्या विविध प्रकारांना संकलीत करून माहिती आणि प्रात्यक्षिका द्वारे योगाभ्यासाचा सराव करण्यासाठी प्रेरीत करण्यात आले.


योगाअभ्यासाने मनावरील ताण कमी झाल्याचे जिल्हा अग्रणी प्रबंधक युवराज टेंभूर्णे यांनी आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम यांनी केले. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos