महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कारासाठी व्यक्ती व संस्थांकडून अर्ज आमंत्रित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार देण्यात येतो. सन २०२३ साठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी दिव्यांग व्यक्ती व संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक दिव्यांग व्यक्ती व दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थांनी ३१ जुलै पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

ईच्छुक व्यक्ती व संस्थांनी www.awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे. सन २०१३ करीता नामांकन व अर्ज गृह मंत्रालयाने तयार केलेल्या URL. www.awards.gov.in  या ऑनलाईन पोर्टलवर पासवर्ड संरक्षित करुन सादर करावा. पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विशिष्ट नमुन्यातील अर्जामधील सर्व मुद्यांची माहिती उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्याच्या सविस्तर वर्णनासह भरावी. समक्ष अथवा पोष्टाव्दारे सादर केलेले अर्ज स्विकारले जाणार नाही.

पुरस्काराबाबत पात्रता व इतर सविस्तर माहिती www.disabilityaffairs.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos