दहावीच्या विज्ञानाच्या पुस्तकात अजब तर्कट , म्हणे, लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवल्याने एड्स होतो !


वृत्तसंस्था / तिरुअनंतपुरम :   केरळमधील दहावीच्या बायोलॉजीच्या पुस्तकात अजब तर्कट मांडले आहे.  लग्नाआधी किंवा विवाहबाह्य शारीरिक संबंध ठेवल्याने एड्स होत असल्याचे   पुस्तकात नमूद करण्यात आले आहे.    या  चुकीच्या  उल्लेखामुळे  गोंधळ उडाला आहे.
या पुस्तकात एचआयव्ही विषाणूंची माहिती देणारा एक धडा आहे. त्यात एड्स हा दुर्धर आजार होण्याची कारणे देण्यात आली आहे. त्यात लग्नाआधी किंवा विवाहबाह्य शारीरिक संबंध ठेवल्याने एड्स होत असल्याचे देखील नमूद केलेले आहे. याविषयी केरळमधील एका शिक्षिकेने सोशल मीडियावर टाकल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर शिक्षण विभागाने ही चूक दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले असून पुढिल वर्षासाठी छापण्यात येणाऱ्या पुस्तकातून तो उल्लेख काढून टाकण्यात आला आहे.  Print


News - World | Posted : 2019-03-06


Related Photos