८ धावांनी विजय मिळवत भारतीय संघाने रचला इतिहास, भारतीय संघाचा वन-डे क्रिकेटमधला ५०० वा विजय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : 
 भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात  मात करत मालिकेत २ - ०  ने आघाडी घेतली आहे . हा विजय भारतीय संघाचा वन-डे क्रिकेटमधला ५०० वा विजय ठरला आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या संघाने अशी कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ ५५८ वेळा वन-डे सामने जिंकले आहे.  टीम इंडियाने या सामन्यात दिलेलं  २५१ धावांचं आव्हान पूर्ण करताना ऑस्ट्रेलियाचा संघ २४२ धावांपर्यंत मजल मारु शकला. ८  धावांनी विजय मिळवत   भारतीय संघाने इतिहासात आपली नोंद केली आहे. 
आश्वासक सुरुवातीनंतर ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर भारतीय फिरकीपटूंच्या जाळ्यात अडकले. यानंतर ठराविक अंतराने ऑस्ट्रेलियाचे फलंदाज विकेट फेकत राहिले. मार्कस स्टॉयनिस, पीटर हँडस्काँब यांनी मधल्या षटकांमध्ये भारताला चांगली झुंज दिली. मात्र अखेरच्या षटकात विजय शंकरने दोन बळी घेत सामना भारताच्या नावे केला. या मालिकेतला तिसरा सामना शुक्रवारी रांचीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2019-03-05


Related Photos