हाफिज सईद याच्या दोन दहशतवादी संघटनांवर पाकिस्तान सरकारची बंदी


वृत्तसंस्था / नवीदिल्ली : पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी कायदा १९९७ या अन्वये ही कारवाई करण्यात आली  असून २६/११ या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद याच्या दोन दहशतवादी संघटनांवर पाकिस्तान सरकारने बंदी घातली आहे.  जमात उद दावा आणि फलाह ए इन्सानियत अशी बंदी घालण्यात आलेल्या दोन दहशतवादी संघटनांची नावं आहेत.  
जम्मू काश्मीरच्या पुलवामा या भागात जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात भारताचे चाळीस जवान शहीद झाले. यानंतर पाकिस्तानने आता मसुद अझरच्या भावासह ४४ दहशतवाद्यांना अटक केली. ही कारवाई मंगळवारीच करण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता पाकिस्तानने हाफिज सईदच्या दोन दहशतवादी संघटनांवरही बंदी घालण्याची कारवाई केली आहे.
पाकिस्तानने जो हल्ला घडवला त्यानंतर १२ दिवसांनी भारतीय वायुदलाने बालाकोट या ठिकाणी हवाई हल्ला करून पुलवामाचे चोख प्रत्युत्तर दिले. यानंतर पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारताच्या हवाई हद्दीत शिरण्याचा प्रयत्न केला मात्र भारतीय वायुदलाने अत्यंत शिताफीने आणि वेगाने या विमानांना पिटाळले. ही विमाने पिटाळतानाच भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन हे पाकिस्तानात गेले होते. तिथे त्यांच्या विमानाचा अपघात झाला आणि पॅराशूटच्या मदतीने ते खाली उतरले आणि पाकिस्तानच्या तावडीत सापडले. मात्र त्यांनाही पाकिस्तानने सुमारे ६० तासांनी मायदेशी पाठवले. आता पाकिस्तानने हाफिज सईदच्या दोन दहशतवादी संघटनांवर बंदीची कारवाई केली आहे.
हाफिज सईद याच्या जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशनवर बंदी घालण्याची घोषणा पाकिस्तानने एक आठवड्यापूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत केली होती. मात्र सोमवारपर्यंत ही बंदी घालण्यात आली नव्हती.   या दोन संघटनांवर बंदी घालण्यात आल्याची घोषणा पाकिस्तानने केली आहे.  Print


News - World | Posted : 2019-03-05


Related Photos