गोंदिया जिल्ह्यातील वाळुघाटाचे ई-लिलाव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया :
३ जानेवारी २०१८ च्या महसूल व वन विभाग शासन निर्णयानुसार सन २०१८-१९ करीता ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत कालावधीकरीता जिल्ह्यातील १८ वाळू/रेतीघाटाचे लिलाव ई-लिलाव व ई-ऑक्शन पध्दतीने करावयाचे असल्याने आयुक्त यांनी अपसेट प्राईज (हाताचे किंमतीला) मान्यता प्रदान केली आहे.
त्यानुसार जिल्ह्यातील वाळुघाटाचे ई-लिलाव/ई-ऑक्शनचे रजिस्ट्रेशन ४ मार्च पासून सुरु झाले असून ११ मार्च रोजी सायंकाळी ५. ४५ वाजता ऑनलाईन रजिस्ट्रेशन बंद होईल. १२ मार्च रोजी सकाळी १० वाजता पासून ई- निविदा ऑनलाईन पध्दतीने जमा करणे सुरु होईल. १८ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता ई-निविदा ऑनलाईन पध्दत बंद होईल व १९ मार्च रोजी लॉट निहाय रेतीघाटाचे ई-निविदा डाऊनलोड करुन जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात ई-निविदा उघडण्यात येईल. वाळुघाट लिलावासंबंधी अटी व शर्ती, वाळुघाट यादी व इतर माहिती http://gondiaco.abcprocure.com व www.gondia.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आली आहे.
 ई-निविदा व ई-लिलाव बाबत ७ मार्च २०१९ रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. तरी इच्छुक कंत्राटदारांनी या प्रशिक्षणास उपस्थित राहावे, असे अपर जिल्हाधिकारी गोंदिया यांनी कळविले आहे.  Print


News - Gondia | Posted : 2019-03-05


Related Photos