गडचिरोली जिल्हा युवक काॅंग्रेसची जंबो कार्यकारीणी जाहिर


- अहेरी विधानसभा युवक काॅंग्रेस अध्यक्षपदी आकाश परसा यांची निवड
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
युवक काॅंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या आदेशानुसार गडचिरोली जिल्ह्यात युवक काॅंग्रेसची जंबो कार्यकारीणी गठीत करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्हा युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहिर केल्या. यामध्ये अहेरी विधानसभा युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष म्हणून आकाश परसा यांची निवड करण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्हा युवक काॅंग्रेसचे जिल्हा महासचिव, जिल्हा प्रवक्ता म्हणून मनोज दुनेदार, जिल्हा महासचिव आशिष कन्नमवार, बालाजी गावडे, जिल्हा सचिव म्हणून नितेश राठोड, अब्दूल निसार शेख, स्वप्नील मानापुरे, अमित भांडेकर, अमोल गोटे, प्रतिक बारसिंगे, सतिश दोनाडकर यांची निवड करण्यात आली आहे.
गडचिरोली तालुका युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष म्हणून घनश्याम मुरवतकर, चामोर्शी तालुकाध्यक्ष लोकेश शांतलवार, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, अहेरी तालुकाध्यक्ष रज्जाक पठाण, एटापल्ली तालुकाध्यक्ष मोहन नामेवार, सिरोंचा तालुकाध्यक्ष कौसर खान, वडसा तालुकाध्यक्ष बबन गायकवाड, कोरची तालुकाध्यक्षपदी लिकेश अंबादे, मुलचेरा तालुकाध्यक्षपदी शुभम शेंडे, कुरखेडा तालुकाध्यक्षपदी गिरीधर तितराम, आरमोरी तालुकाध्यक्षपदी सौरभ जक्कनवार यांची निवड करण्यात आली आहे.
गडचिरोली विधानसभा युवक काॅंग्रेसच्या महासचिवपदी महेश जल्लेवार व भुषण भैसारे यांची निवड करण्यात आली आहे. गडचिरोली विधानसभा सचिवपदी अभिजीत धाईत, विजय वाघुळकर, राहुल मुनघाटे, नितीन खिरटकर, तुषार मंगर, श्रीराम मडावी, विवेक घोंगडे यांची निवड करण्यात आली आहे.
आरमोरी विधानसभा युवक काॅंग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून कमलेश बारसकर, योगराज नखाते, विधानसभा महासचिव पदी जिशांन मेमन, भुपेंद्र राजगिरे, ताहिर शेख, समेक्ष धाईत, हितेंद्र तुपट, धनराज मडावी, राशिद पठाण यांची निवड करण्यात आली. आरमोरी विधानसभा सचिवपदी उज्वला मडावी, खुमेश दुपजारे, निलेश अंबादे, जसपाल चव्हाण, पंकज लांडे, सचिन लांडे, महेश वाढई यांची निवड करण्यात आली आहे.
अहेरी विधानसभा युवक काॅंग्रेसच्या महासचिवपदी अंकीत वरगंटीवार, उमेश कडते, रूषी सडमेक, सलमान शेख, अहेरी विधानसभा सचिवपदी मुनेश चंद्रय्या गुंडावार, सैफ शेख, प्रकाश नैताम, महेश कुरखेडे, इरफान शेख यांची निवड करण्यात आली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-05


Related Photos