आरटीई : गडचिरोली जिल्ह्यात ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी मदत केंद्राचे उदघाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
स्थानिक गोकुळनगरातील अंगणवाडी क्र. २३ येथे आज प्रकल्प अधिकारी मनीष गणवीर यांच्या हस्ते फित कापून फिरत्या आरटीई मदत केंद्राचे उदघाटन करण्यात आले .
जिल्ह्यात झोपडपट्टी आणि दलित वस्त्यांमध्ये बार्टीचे समतादूत घरोघरी जाऊन गोरगरीब व अशिक्षित पालकांना शिक्षण व आरटीई  अंतर्गत त्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी जिल्ह्यातील समतादूत यांनी डिसेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ पर्यंत अथक परिश्रम घेऊन ८७० ऑफलाइन अर्ज भरले . राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाची संस्था असलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे या संस्थेच्या समतादूत या विशेष प्रकल्पच्या माध्यमातून समाजाचा सामाजिक , शैक्षणिक व  आर्थिक या बाबींचा विकास करण्यासाठी हा प्रकल्प  कार्यरत असून , दुर्बल व वंचित घटकातील मुलांना आरटीई मधून इंग्रजी शाळेत प्रवेश मिळावा यासाठी महासंचालक कैलास कणसे यांच्या मार्गदर्शनातून व मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात समतादूत मार्फत आरटीई ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मोफत मदत केंद्र सुरु करण्यात आले असून त्याचा आज उदघाटन करण्यात आला . 
,यावेळी मनीषा दरडमारे, अंगणवाडी सेविका मनीषा जुरमेड यांच्यासह समतादूत वंदना धोंगडे , होमराज कवडो , संघरत्न कुंभारे , जयलाल सिन्द्राम यांच्यासह पालकवर्ग उपस्थित होते .  

फिरते आरटीई कार्यरत मदत केंद्र समतादुत यांच्याशी संपर्क करा : मनीष गणवीर 

सोनाप - ९४०४६४४३४८ , कुंभारे – ९४२२९६२५३७ , वकडो- ८५५४९३२१७५ ,सिन्द्राम  – ९४२११९९३५२  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-05


Related Photos