महत्वाच्या बातम्या

 लकडगंज आरा मशीन कारखान्याला आग : साहित्य जळून खाक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : नागपूरच्या लकडगंज परिसरातील आरा मशीन (लाकडाच्या कारखान्याला) कारखान्याला मध्यरात्री आग लागली.

या आगीत पाच कारखान्यातील मोठ्या प्रमाणात लाकूड जळाल्याची माहिती आहे. 3 वाजताच्या सुमारास घटनेची सूचना अग्नीशमन विभागाला मिळाली. १० फायर टेंडर द्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या आगीत किती रुपयांचे नुकसान झाले, आग कशामुळे लागली याचा पंचनामा अग्निशमन विभाग करीत आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos