११ मार्च रोजी आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा ?


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  आगामी लोकसभा निवडणुकीची पुढील सोमवारी, ११ मार्च रोजी घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. ही निवडणूक सात ते आठ टप्प्यांमध्ये होईल, अशी चिन्हे आहेत. 
पंतप्रधान मोदी आज, मंगळवारी गुजरातमध्ये असून, ६ मार्चला कर्नाटक आणि तामिळनाडू, ७ मार्चला दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आणि भाजप बैठकीस उपस्थित राहतील. ८ मार्च रोजी मोदी गाझियाबाद, कानपूर आणि आग्रा मेट्रोचे भूमिपूजन व नागपूर मेट्रोचे व्हिडीओ लिंकद्वारे लोकार्पण करणार आहे. ९ आणि १० मार्चला शनिवार-रविवार असल्यामुळे निवडणूक घोषणा होण्याची शक्यता अंधुक आहे. त्यामुळे सोमवारी, ११ मार्च रोजी निवडणूक आयोग निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करील, असे सूत्रांचे म्हणणे आहे. निवडणूक आयोग घोषणा करेपर्यंत पंतप्रधान मोदी आपले काम सुरू ठेवतील, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. सन २०१४मध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा ५ मार्च रोजी करण्यात आली आणि प्रत्यक्ष निवडणूक ७ एप्रिल ते १२ मे दरम्यान ९ टप्प्यांमध्ये झाली होती.   Print


News - World | Posted : 2019-03-05


Related Photos