ठरवलेल्या लक्ष्यावर प्रहार झाला की, नाही ते आमच्यासाठी महत्वाचे : हवाई दल प्रमुख बीरेंद्र सिंग धनोआ


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  ठरलेल्या  लक्ष्यावर अचूक प्रहार केल्यानंतर किती जण ठार झाले ते मोजण्याचे काम हवाई दल करत नाही. ते सरकारचे काम आहे असे  हवाई दल प्रमुख बीरेंद्र सिंग धनोआ यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.  भारतीय हवाई दलाने बालकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर केलेल्या कारवाईबाबत काहीजण प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. यावर हवाई दल प्रमुख बीरेंद्र सिंग धनोआ यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना ठरवलेल्या लक्ष्यावर प्रहार झाला की, नाही ते आमच्यासाठी  असे म्हटले आहे. 
 भारतीय हवाई दलाने जैश-ए-मोहम्मदच्या तळावर केलेला हल्ला तसेच पाकिस्तानच्या ताब्यातून विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका झाल्यानंतर आज प्रथमच हवाई दल प्रमुखांनी पत्रकार परिषद घेतली.   पाकिस्तानातील बालकोटमध्ये आम्ही लक्ष्यावर अचूक प्रहार केला. आम्ही जंगलामध्ये बॉम्ब टाकले असते तर मग पाकिस्तानने त्यावर प्रतिक्रिया का दिली ? असा सवाल हवाई दल प्रमुख बीरेंद्र सिंग धनोआ यांनी विचारला. मिग-२१ बायसन हे पूर्णपणे सक्षम विमान आहे. ते अपग्रेड करण्यात आले आहे. चांगल्या दर्जाच्या रडारसह, हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आणि चांगल्या शस्त्रास्त्रांनी हे विमान सुसज्ज आहे असे हवाई दल प्रमुखांनी सांगितले. 
एक ठरवलेले ऑपरेशन असते. ज्याचे नियोजन तुम्ही करता आणि ते प्रत्यक्षात आणता. पण जेव्हा शत्रू तुमच्यावर हल्ला करतो तेव्हा उपलब्ध असलेल्या प्रत्येक फायटर विमानाकडून उत्तर दिले जाते. मग ते फायटर विमान कुठलेही असो. आपली सर्व फायटर विमाने शत्रूचा मुकाबला करण्यास सक्षम आहेत असे हवाई दल प्रमुखांनी सांगितले.  Print


News - World | Posted : 2019-03-04


Related Photos