‘हर - हर महादेव’ च्या गजरात मार्कंडादेव यात्रेला उत्साहात प्रारंभ, हजारो भाविकांचे जत्थे दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / मार्कंडादेव (गडचिरोली) :
आज ४ मार्च पासून महाशिवरात्री उत्सवास प्रारंभ झाला असून ‘हर हर महादेव’ च्या गजरात मार्कंडादेव येथे महादेवाची पुजा अर्चा करून यात्रेस प्रारंभ करण्यात आला. यात्रेनिमित्त श्री मार्कंडेश्वराचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांचे जत्थे मार्कंडादेव येथे दाखल झाले आहेत. पहाटे ४ वाजता भगवान शिव, पिंडीची मुख्य महापूजा करण्यात आली. अभिषेक करण्यात आले.
महापूजेला खा. अशोक नेते, आ. डाॅ. देवराव होळी, बिनाराणी होळी, जि.प. अध्यक्षा योगिताताई भांडेकर, पुजारी पंकज पांडे, शुभांगी पांडे, पराग आईंचवार, अमृता आईंचवार, पं.स. सभापती आनंद भांडेकर, वर्षा भांडेकर आदी उपस्थित होते. 
पहाटे ४ वाजतापासून सकाळी ६ वाजतापर्यंत महापुजा होती. यावेळी दर्शनासाठी रांगेत पहिले असलेले वारकरी जितेंद्र कोवे यांचे देवस्थान ट्रस्टच्या वतीने स्वागत करण्यात आले. यानंतर भाविकांसाठी दर्शन सुरू करण्यात आले. आज पहिल्या दिवशी हजारो भाविकांनी मार्कंडेश्वराचे दर्शन घेतले. आदिवासी बांधवांनी आदिवासी संस्कृतीनुसार गोत्रपुजा केली.  

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-04


Related Photos