भारत-ऑस्ट्रेलिया एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यासाठी नागपुरात कडेकोट बंदोबस्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : 
नागपुरातील जामठा स्टेडियमवर मंगळवारी भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना पार पडणार आहे. या सामन्याच्या निमित्ताने पोलिसांनी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभारली आहे.  पुलवामा हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच्या क्रिकेट सामन्याच्या बंदोबस्ताच्या तुलनेत यावेळी ३० टक्के पोलीस बंदोबस्त जास्त लावण्यात आल्याची माहिती सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी दिली. 
५ मार्चला जामठ्याला होऊ घातलेल्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याच्या निमित्ताने पोलिसांनी कशी सुरक्षा व्यवस्था केली, त्याची माहिती सहआयुक्त कदम यांनी रविवारी सायंकाळी पोलीस जिमखान्यात पत्रकारांना दिली. यावेळी वाहतूक शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे, गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम, विशेष शाखेच्या उपायुक्त निर्मलादेवी आणि परिमंडळ-१चे उपायुक्त विवेक मासाळ उपस्थित होते.  छत्रपती चौक ते जामठा स्टेडियमपर्यंत बंदोबस्ताची विभागणी १२ सेक्टरमध्ये करण्यात आली आहे. त्यासाठी १२०० पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण १५०० पोलीस अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तात तैनात राहणार आहेत. याव्यतिरिक्त वाहतूक शाखेचे ४२५ पोलीसही सुरक्षा व्यवस्थेत तैनात राहणार असल्याचे सहआयुक्त कदम म्हणाले.   Print


News - Nagpur | Posted : 2019-03-04


Related Photos