महत्वाच्या बातम्या

 डिजिटल सातबारा आता मिळणार मोबाइल ॲपवर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : महसूल विभागाने संगणकीकृत केलेला आणि महाभूमी संकेतस्थळावर सर्व नागरिकांसाठी आता डिजिटल सातबारा उपलब्ध केला आहे. आता हा सातबारा केंद्र सरकारच्या उमंग मोबाइल ॲपवरही उपलब्ध होणार आहे.

त्यामुळे कधीकाळी ग्रामपंचायत कार्यालयात हेलपाटे मारल्याशिवाय मिळणे शक्य नसलेला सातबारा आता मोबाइल ॲपवर सहज उपलब्ध होणार आहे.

आता उमंग ॲपवरही उपलब्ध होणार

आता ही सुविधा केंद्र सरकारच्या उमंग या मोबाइल ॲपवरही उपलब्ध आहे. हे मोबाइल ॲप गुगल प्ले स्टोअरवरून घेता येईल.

- राज्यातील सर्व अडीच कोटी सातबारा त्यावर उपलब्ध असतील.

- महाभूमी संकेतस्थळावर उपलब्ध महसूल विभागाने विकसित केलेल्या महाभूमी या पोर्टलवर उतारे उपलब्ध आहेत.

- आता ही सुविधा केंद्र सरकारच्या उमंग या मोबाइल ॲपवरही उपलब्ध होत आहे.

शुल्क किती?

महसूल विभागाने विकसित केलेल्या महाभूमी या सरकारच्या अधिकृत पोर्टलवर सातबारा उतारा, ८ अ उतारा उपलब्ध होत आहे. या महाभूमी पोर्टलवर पंधरा रुपयांत सातबारा उतारा मिळत आहे. यापूर्वी नागरिकांना डिजिटल स्वाक्षरी सातबारा उताऱ्याची प्रत मिळविण्यासाठी महा-ई-सेवा केंद्र किंवा झेरॉक्स सेंटर यांचा आधार घ्यावा लागत होता. त्यामुळे १५ रुपयांच्या सातबारा उताऱ्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत होते. पोर्टलवर ही सुविधा केवळ १५ रुपयांत देण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी उमंग मोबाइल ॲपवर डिजिटल स्वरूपात उतारा मिळणे सहज शक्य झाले आहे, असे महसूल विभागाचे म्हणणे आहे.





  Print






News - Rajy




Related Photos