महत्वाच्या बातम्या

 गडचिराेली जिल्ह्यात २९२ मतदारांनी ओलांडली वयाची शंभरी


विदर्भ न्यूज  एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : पुढील वर्षीच्या संभाव्य निवडणुकीच्या दृष्टीने निवडणूक विभागाने मतदार याद्या पुनरीक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
सदर कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रनिहाय मतदारांची संख्या, वाेटिंग कार्ड-आधार कार्ड लिंक करणे यासह जिल्ह्यातील मतदार यादीतील ८० वर्षे वयावरील मतदारांची संख्या जाहीर केली.
त्यानुसार १५ जून २०२३ पर्यंत जिल्ह्यात १८ हजार ८२४ मतदार ८० वर्षांहून अधिक वयाची आहेत. विशेष म्हणजे, २९२ मतदारांनी वयाची शंभरी ओलांडली आहे. जिल्ह्यात आरमाेरी, गडचिराेली व अहेरी असे तीन

विधानसभा क्षेत्र आहेत. विधानसभेचे तिन्ही क्षेत्र अनुसूचित जमातीसाठी राखिव आहेत.


तीन हजार मतदार नव्वदी पार : 
जिल्ह्यात ९० ते ९९ वर्षे ह्या वयाेगटातील मतदारांची संख्या २ हजार ९९७ आहे. आरमाेरी विधानसभा क्षेत्रात ८२१, गडचिराे क्षेत्रात १ हजार २९४ तर अहेरी विधानसभा क्षेत्रातील ८८२ मतदारांनी वयाची नव्वदी ओलांडली. सर्वाधिक ज्येष्ठ मतदार गडचिराेली विधानसभा क्षेत्रात आहेत. शंभरी ओलांडलेल्या सर्वाधिक ११६ मतदारांची संख्यासुद्धा याच क्षेत्रात आहे.


८० वर्षांवरील जिल्ह्यातील एकूण मतदार :  

विधानसभा क्षेत्र वय ८०-८९ वय ९०-९९ वय १०० वरील एकूण मतदार

आरमाेरी ४,६५६ ८२१ ७५ ५,५५२

गडचिराेली ६,२३९ १,२९४ ११६ ७,६४९

अहेरी ४,६४० ८८२ १०१ ५,६२३

एकूण १५,५३५ २,९९७ २९२ १८,८२४





  Print






News - Gadchiroli




Related Photos