महत्वाच्या बातम्या

 लाकूड आगारात आग : मोठा अनर्थ टळला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : येथील वन विभागाचा अंतर्गत येणाऱ्या वाहतूक व विपणन मध्ये सोमवारी रात्री १ वाजता एका झाडाला आग लागली होती. रात्रीच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. त्यात आग आटोक्यात आणले त्यामुळे मोठा अनर्थ टळला.


अग्निशमन  गाडी पासून ४०० फूट पाइप लावून आगी वर नियंत्रण आणले. आग पर्यंत जाण्याकरिता रस्ता नव्हता, लाकडे अस्त्वस्त होते तसेच अंधार होता पण अग्निशमन दलाचे जवानांनी एका तासात आगी वर नियंत्रण आणले. बल्लारपूर नगर परिषद चे मुख्याधिकारी यांचा मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलचे प्रभारी शब्बीर अली व कर्मचारी शुभान कुरेशी, विजय, सागर लोखंडे, सुधीर चीखराम, रितेश, सागर, हरिओम, सादिक यांनी विशेष कामगिरी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos