कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केले खासदारांच्या कार्यालयासमोर ठिया आंदोलन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्यात विविध विभागात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज ३ मार्च रोजी खा. अशोक नेते यांच्या कार्यालयासमोर ठिया आंदोलन केले. 
सर्व शिक्षा अभियान, राष्टीय आरोग्य अभियान, नरेगा, स्वच्छता मिशन, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, पेसा, महाराष्ट्र राज्य जिवनोन्नती अभियान, राष्ट्रीय कुष्टरोग कार्यक्रम, शालेय पोषण आहार योजना, स्वच्छ भारत मिशन, पाणी पुरवठा, विद्यूत विभाग, ग्रामरोजगार सेवक, पंतप्रधान ग्राम सडक योजना, आत्मा, भूजल सर्व्हेक्षण , पाणलोट क्षेत्र, आशा वर्कर, दिनदयाळ योजना, राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण, एड्स नियंत्रण सोसायटी तथा सर्व विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक आयोजित करावी यासाठी खासदारांची भेट घेवून २४ फेब्रुवारी रोजी   भेट घडवून देण्याचे सांगितले. तसेच सभा आयोजित न केल्यास ठिया आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत खा. अशोक नेते यांनी बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. तरीही कर्मचार्यांचे समाधान न झाल्याने कर्मचाऱ्यांचा आक्रोश लक्षात घेता पुन्हा संघटनेच्या शिष्टमंडळाने २८ फेब्रुवारी  रोजी खासदार अशोक नेते यांच्या गडचिरोली येथील निवासस्थानी भेट घेवून निवेदन दिले. तसेच चर्चा केली. यावेळी खा. नेते यांनी 2 मार्चपर्यंत बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते. तसेच पत्र संघटनेला प्राप्त न झाल्यास 3 मार्च रोजी खा. नेते यांच्या कार्यालयासमोर ठिया आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. आश्वासन पूर्ण न झाल्याने अखेर आज राज्य कंत्राटी कर्मचारी  महासंघ जिल्हा गडचिरोलीच्या वतीने ठिया आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यात कार्यरत सर्व विभागातील कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले होते. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-03


Related Photos