रापम च्या ३६ बसेस देणार महाशिवरात्री निमित्त भाविकांना सेवा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली  :
  विदर्भाची काशी समजल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव तसेच ईतर ठिकाणी महाशिवरात्री यात्रेनिमित्त राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने एकंदरीत ३६ बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली येथील आगारातील अधिकाऱ्यांनी दिली.
येत्या ४ मार्चपासुन महाशिवरात्री यात्रेस प्रारंभ होत आहे.गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव , चपराळा, आरमोरी तालुक्यातील वैरागड, अरततोंडी, आरमोरी येथील डोंगरीवरील महादेव, ठाणेगांव येथील हेमांडपंथी देवस्थान यासह अनेक ठिकाणी महाशिवरात्रीची यात्रा भरत असते.
या यात्रेसंदर्भात सबंधित ठिकाणी देवस्थान समिती व प्रशासनाच्यावतीने जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. विदर्भाची काशी समजल्या जाणाऱ्या मार्कंडादेव येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येत असतात. या भाविकांना प्रवास करणे सुखकर व्हावे म्हणुन गडचिरोली आगाराच्यावतीने मार्कंडादेव येथे अस्थायी वाहनतळाची निर्मीती केली आहे.
गडचिरोली आगारातून मार्कंडादेव  येथे ३५ बसेस सोडण्यात येणार आहेत. यामध्ये गडचिरोली येथून १८, चामोर्शी येथुन ९, व्याहाड खुर्द येथुन ३, व्याहाडबुजरूक येथून १,सावली येथून ४ बसेस सोडल्या जाणार आहेत. अरततोंडीच्या महादेव यात्रेसाठी १ बस सोडली जाणार आहे.  गेल्या वर्षी राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगारास यात्रेच्या कालावधीत ११ लाखाचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी किमान १८ ते १९ लाख रूपयांचे उत्पन्न मिळेल अशी आशा राज्यपरिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-03


Related Photos