काश्मीरमध्ये चकमकीत सीआरपीएफचे दोन जवान आणि दोन स्थानिक पोलिस शहीद


वृत्तसंस्था / श्रीनगर :  जम्मू-काश्मीरच्या हंडवाडा परिसरात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे दोन जवान आणि दोन स्थानिक पोलिस शहीद झाल्याचे  वृत्त आहे. यामध्ये एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती आली आहे.  सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारपासून चकमक सुरू आहे. कुपवाडामध्ये झालेल्या चकमकीत चार जवान शहीद झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली आहे. घटनास्थळी अद्यापही सुरक्षा दलांकडून ऑपरेशन सुरू असल्याची माहिती आहे. वृत्तसंस्था एएनआयने याबबातचं वृत्त दिलं आहे.  
जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हंडवाडाच्या बाबागुंड परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर शोधमोहिम सुरू होती. दहशतवादी रहिवाशी इमारतीत लपल्याची माहिती मिळाल्याने सुरक्षा दलांचा त्या दृष्टीकोनातून तपास सुरू असतानाच एका इमारतीतून दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यांच्या गोळीबाराला सुरक्षा दलानेही चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र यामध्ये किती दहशतवाद्यांचा खात्मा झाला याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही, पण यामध्ये २ सीआरपीएफ जवान आणि २ पोलिसांना वीरमरण आले आहे.   Print


News - World | Posted : 2019-03-03


Related Photos