राफेल विमाने असते तर आणखी बरेच काही साध्य करता आले असते : पंतप्रधान नरेंद्र मोदी


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण स्थितीच्या पार्श्वभूमीवर राफेल विमानखरेदीचे समर्थन करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  'आज आपल्याकडे राफेल विमाने असतात, तर आणखी बरेच काही साध्य करता आले असते', असे प्रतिपादन एका कार्यक्रमात केले. राफेल सौद्यावरून विरोधकांकडून सातत्याने टीका होत असताना या व्यवहाराचे समर्थन करत मोदींनी त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. 
'राफेल खरेदीप्रकरणी यापूर्वी स्वार्थ व आता होत असलेल्या राजकारणामुळे देशाचे प्रचंड नुकसान झाले आहे. देशात आज राफेलची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे. राफेल असतात, तर खूप काही साध्य करता आले असते असे संपूर्ण देश एकसुरात म्हणत आहे, असे मोदी म्हणाले.    Print


News - World | Posted : 2019-03-03


Related Photos