महत्वाच्या बातम्या

 जिल्हास्तरीय युवा उत्सव उत्साहात साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : नेहरू युवा केंद्राच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्य ९ जून रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्याच्या संग्रामातील देशभक्तीची भावना रुंदगीत करणे आणि तरुण युवक कलावंताना व्यासपीठ निर्माण करून देण्याचे उद्देशाने चित्रकला, कविता लेखन, छायाचित्रण, भाषण स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आणि जिल्हा युवा संमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी हितेंद्र वैद्य यांनी शासन आपल्या दारी अंतर्गत शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.

या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रमुख पाहुणे म्हणून भंडारा व गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे, जिल्हा पोलिस अधिक्षक लोहित मतानी, भंडारा नगर परिषद माजी उपाध्यक्ष आशुतोष गोंडाने, संस्थापक डिफेन्स अकॅडमी शहापूर येथील प्रा. नरेंद्र पालांदुरकर, समुपदेशक शासकिय रुग्णालय सुरेश ठाकरे, डिफेन्स सर्विसेस अकॅडमी शहापूर मेजर कटरे, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी हितेंद्र वैद्य, कार्यक्रम सहाय्यक रमेश अहिरकर आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पर्यावरणावरती विशेष कार्य केलेले शासनाचे प्रचार प्रसारक कार्तिकस्वामी मेश्राम यांना सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात जिल्हा स्तरीय भाषण स्पर्धेत श्वेता खोब्रागडे, महेश मेश्राम, पानेरी निखाडे, छायाचित्र प्रदर्शनी स्पर्धेत आकाश गेडाम, डिंपल कापगते, मयुरी पिलारे, चित्रकला स्पर्धेत वेद धकाले, जास्मिन डोंगरे, पूर्वेस समरीत, कविलेखन स्पर्धेत मेघा मिश्रा, कुंजन तिघरे, नैना सावरबांधे या विजेत्या स्पर्धकांचा स्मृतिचिन्ह सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.

सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पहिला क्रमांक युवक बिरादरी युवा मंडळ भंडारा, दुसरा क्रमांक परमपूज्य डान्स ग्रुप पवनी व तिसरा क्रमांक जिजाऊ गर्ल्स डान्स ग्रुप लाखांदूर या ग्रुपने पटकाविले कार्यक्रमाचे संचालन व आभार नेहरू युवा केंद्राचे राष्ट्रीय स्वयंसेवक कोयल मेश्राम यांनी केले.





  Print






News - Bhandara




Related Photos