महत्वाच्या बातम्या

 भंडारा येथे २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे भव्य आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा :
जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, नेहरु युवा केंद्र, जे.एम. पटेल महाविद्यालय, पतंजली योग, जिल्हा योग संघटना, तसेच जिल्हयातील विविध सामाजिक संघटना यांचे संयुक्त विद्यमाने जे.एम. पटेल महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचाचे 21 जून रोजी सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
जिल्हयातील सर्व नागरीक, शिक्षक, खेळाडू, विद्यार्थी, योगाप्रेमी, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी जास्तीत जास्त संख्येनी उपस्थित राहावे. शिबीरात येतांना योगा मॅट (चादर) सोबत आणावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम यांनी केले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos