लभानतांडा गावाजवळ दुचाकीच्या धडकेत निलगाय ठार, दुचाकीस्वार गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
आलापल्ली जवळील लभानतांडा गावाजवळ दुचाकीसमोर आलेल्या निलगायीस दुचाकीस्वाराने धडक दिल्याने निलगाय ठार झाली असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.
राजेश बाबुराव गंपावार असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्यांना चंद्रपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार मृत निलगाय पाण्याच्या शोधात फिरत आली असावी. अचानक दुचाकीसमोर आल्याने दुचाकीला धडक बसली. यामध्ये ती ठार झाली. मृत निलगायीने नुकतेच पिल्लांना जन्म दिले असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या उन्हाळ्यास प्रारंभ होत असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकंती करतात. यामुळे अनेक प्राणी पाण्याविना तसेच इतर घटनांमध्ये मृत पावत असतात. यामुळे वनविभागाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-02


Related Photos