रोहयो च्या कामावरील मजुराचे हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने निधन : देसाईगंज तालुक्यातील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
तालुक्यातील विसोरा येथील ग्रामपंचायत अंतर्गत सुरु असलेल्या रोजगार हमीच्या कामावरील ६० वषींय कामगाराचा हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाल्याची घटना आज सकाळी ११. ३० वाजताच्या सुमारास घडली.
 प्रभाकर जैराम नेवारे असे मृतकाचे नाव असुन तो येथील ग्रामपंचायत अंतर्गत सुरु असलेल्या रोजगार हमीच्या कामावर गेला असता ११ वाजताच्या दरम्यान अचानक त्याच्या छातीत वेदना सुरु झाल्या, त्याला देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी तातडीने घटनास्थळ गाठुन मृतकाच्या कुटुंबास तत्काळ आर्थिक मदत केली. त्यांच्या अशा अकस्मात निधनामुळे गावात शोककळा पसरली आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-02


Related Photos