लवकरच फेसबुक व्हाट्सॲपवर करता येणार पैशांचे व्यवहार


वृत्तसंस्था / मुंबई :  क्रिप्टोकरन्सीचा वापर आता व्हाट्सॲपवर  करता येणार आहे. लवकर फेसबुक व्हाट्सॲपवर  डिजीटल कॉइन्स आणणार असून यामुळे व्हाट्सॲपवरही पैशांचे व्यवहार करता येणार आहेत. 
इंटरनेटवर क्रिप्टोकरन्सीचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला आहे. क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून आता डिजीटल पैशांचे व्यवहारही करता येतात. त्याच आधारावर फेसबुकही आता नवीन डिजीटल कॉइन्स व्हाट्सॲपवर आणणार आहे. हे डिजीटल कॉइन्स मॅसेजप्रमाणेच समोरच्याला सेन्ड करता येतील. प्रत्येक कॉइनचे डॉलरमध्ये व संबंधित देशांच्या चलनामध्ये काहीतरी मुल्य असेल. यानुसार ठराविक कॉइन्स पाठवून पैशांचे व्यवहार आता करता येणार आहेत. 
याबद्दल विचारले असता फेसबुकने काहीही प्रतिक्रिया द्यायचे टाळले आहे. तर ही कल्पना प्रायोगिक तत्वावर राबवली जात असून ती यशस्वी झाल्यास ती प्रत्यक्षात येईल अशी माहिती व्हाट्सॲपवमधील सूत्रांनी दिली आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-03-02


Related Photos