पाकिस्तानने अभिनंदन यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी थांबविले वाघा बॉर्डरवर


वृत्तसंस्था /  नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांना  काल शनिवारी भारताकडे सोपविण्य़ात आले. मात्र, अभिनंदन यांचा जबानीचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी पाकिस्तानने त्यांना वाघा बॉर्डरवर थांबवून ठेवण्यात आले होते, अशी माहिती प्राप्त झाली आहे. अभिनंदन यांनी ९ वाजून २१ मिनिटांनी भारतीय भूमीत पाऊल ठेवले. त्यांना तेथून दिल्लीला वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आले आहे. 
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर दबाव वाढल्याने अभिनंदन यांना जिनिव्हा करारानुसार भारताकडे सोपवावे लागले. शुक्रवारी सायंकाळी त्यांना भारताकडे सोपविण्यात येणार होते. मात्र, वाघा बॉर्डरवर आणूनही त्यांना सोडण्याची वेळ दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. याचे कारण धक्कादायक आहे. अभिनंदन यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला. या व्हिडिओमध्ये त्यांना काय बोलायला लावले, याबाबत अद्याप समोर आलेले नसले, तरीही हा व्हिडिओ पाकिस्तान त्यांची बाजू मांडण्यासाठी वापरण्याची शक्यता आहे.    Print


News - World | Posted : 2019-03-02


Related Photos