महत्वाच्या बातम्या

 भाजपा युवा मोर्चाचे पहिले जिल्हाध्यक्ष विलासराव गुडेल्लीवार यांचा खा. अशोक नेते यांनी केले सत्कार


- अहेरी येथे भाजपा तर्फे जेष्ठ कार्यकर्ता संमेलन संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : नरेंद्र मोदी सरकारला ९ वर्ष पूर्ण झाले ह्या निमित्याने भाजपा तर्फे मोदी ९ हे महाजनसंपर्क अभियाना अंतर्गत अहेरी येथील माता कन्यका मंदिरात काल जेष्ठ कार्यकर्ता सम्मेलन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये १९८२ ला आपल्या मोजकया सहकाऱ्यांना सोबत घेत कठिन व विपरीत परिस्थितित अहेरी शहरात भारतीय जनता पार्टिची गडचिरोली जिल्ह्यातील पहिली शाखा उघडणारे तत्कालीन भाजपा युवा मोर्चाचे पहिले जिल्हाध्यक्ष तथा पहिले जिल्हा संघटन महामंत्री विलासराव गुडेल्लीवार यांचा सह अहेरी विधानसभा क्षेत्रातील अनेक जेष्ठ कार्यकर्त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन खा. अशोक नेते यांनी सत्कार केला.

भाजपाची स्थापना १९८० ला झाल्यावर जुन्या कार्यकर्त्यांनी कठीण परिस्थितीत पक्षाची बीजे रोवली आज पक्षाचे वटवृक्ष झाले आहे, जुन्या पिढीतील भाजपा कार्यकर्त्यांचे योगदान आणि त्याग पक्ष कदापी विसरणार नाही, आपला योग्य तो सन्मान पक्षातर्फे केला जाईल, असे प्रतिपादन यावेळी खा. अशोक नेते यांनी केले. या कार्यक्रमासाठी अहेरी विधानसभा क्षेत्रातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते याची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.





  Print






News - Gadchiroli




Related Photos