महत्वाच्या बातम्या

 वर्धा लोकसभा क्षेत्रात गत ९ वर्षात झालेला विकास हीच केंद्र सरकारची जमेची बाजु : खा. रामदास तडस


- विकास तिर्थ उपक्रम अंतर्गत विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी व पाहणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : २०१४ नंतर देशात परिवर्तन झाले व ऱ्या अर्थाने अनेक रखडलेली विकास कामे वर्धा लोकसभा क्षेत्रात पुर्ण करण्याचा संकल्प केन्द्र सरकारने घेतला त्याची आज फलश्रृती म्हणून आज अनेक विकास कार्य रेकार्ड वेळेत पुर्ण झाली व काही प्रगतीपथावर आहे. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या कार्यकाळात आपल्या मतदार क्षेत्रात जी विकास कामे झालेली आहेत, त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देवून भारतीय जनता पक्षाच्या विकास तिर्थ उपक्रम अंतर्गत आज पाहणी करण्यात आल्याची माहिती खा. रामदास तडस यांनी यावेळी दिली.

यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, आ. डॉ. रामदास आंबटकर, जयंत कावळे, विकास तिर्थ संयोजक किशोर दिघे, विकास तिर्थ संयोजक प्रणव जोशी, भाजपा शहर अध्यक्ष पवन परीयाल, जगदीश टावरी, आशिष कुचेवार, सौरभ कडू, दिपक भुते व संबधीत विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

विकास कामे पुर्ण करीत असतांना साहजिकच स्थानिकांना रोजगार मिळाला व त्यामाध्यमातुन त्यांचे जीवनमान सुखावले, वर्धा-नांदेड रेल्वे प्रकल्प प्रधानमंत्री कार्यालयातील प्रगती पोर्टलवर समाविष्ट झाल्याने २०१६ नंतर या प्रकल्पाची गती जलद झाली व परिणामी ऑक्टो/नोव्हे २०२३ मध्ये रेल्वे गाडीची ट्रायल सुरु होणार असुन प्रत्यक्ष वर्धा ते कळंब या सेक्शनचे उद्घाटन जानेवारी २०२४ मध्ये प्रस्तावीत आहे. या प्रकल्पामुळे देवळी शहर व वर्धा जिल्हयातील भिडी हे ग्रामपंचायत असलेले गाव भारतीय रेल्वेच्या नकाशावर प्रथमच येणार असल्याने या कामाबद्दल समाधानी असुन देवळी येथे एमआयडीसीची मागणी लक्षात घेता मालधक्का देखील मंजुर केलेली आहे. केन्द्रीय मंत्री नितीन गडकरी, तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा तत्कालिन मुख्यमंत्री असलेले देवेन्द्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जो विकास निधी वर्ष २०१४ नंतर वर्धा लोकसभा क्षेत्राकरिता दिला तो नागरिकांना विकास कामाच्या माध्यमातुन दिसुन येतो, पुर्वी नागपूर ते वर्धा तसेच वर्धा ते यवतमाळ जाण्यासाठी दोन तासाचा कालावधी लागायचा आज आपण अगदी ५० मिनीटामध्ये नागपूर व यवतमाळ सुरक्षीतपण जाऊ शकते. असे यावेळी खा. रामदास तडस सांगीतले व वर्धा ते नांदेड हा प्रवास देखील भविष्यात रेल्वेच्या माध्यमातुन तीन ते चार तासात करता येणार असल्याचे स्पष्ट केले.

आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी नेतृत्वाखाली केंद्र सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मोदी@९ महा-जनसपंर्क विकास तिर्थ अंतर्गत आज वर्धा लोकसभा क्षेत्रातील विविध विकास कामांची राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१, बुट्टीबोरी-वर्धा-यवतमाळ महामार्गावरील पवनार येथे प्रस्तावीत असलेला बायपासची पाहणी, नागठाणा चौक येथे मंजुर झालेल्या अंडरपासची पाहणी, वर्धा-यवतमाळ-नांदेड नविन रेल्वे लाईन कार्य, केन्द्रीय मार्ग निधी अंतर्गत प्रगतीपथावर असलेला बजाज चौक रेल्वे उड्डाण पुल, सेवाग्राम येथील रेल्वेस्थानक परीसरात निर्माणाधीन असलेल्या मॉडेल स्टेशनची पाहणी, सेवाग्राम बल्हारशाह तिसरी लाईन, सेवाग्राम-नागपूर तिसरी व चौथी लाईनची पाहणी करण्यात आली.





  Print






News - Wardha




Related Photos