भामरागड तालुक्यात ३६७ विद्यार्थ्यांनी दिली इयत्ता दहावीची परीक्षा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
आज १ मार्च पासून दहावीच्या परीक्षेला प्रारंभ झाला. भामरागड तालुक्यातील ३६७ विद्यार्थ्यांनी आज पहिला पेपर दिला. यामध्ये ७ अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
भामरागड तालुक्यात दोन परीक्षा केंद्र आहेत. भामरागड येथील भगवंतराव माध्यमिक शाळा या परीक्षा केंद्रावर १९२ विद्यार्थ्यांचा समावेश होता. यापैकी १८३ विद्यार्थ्यांनी आज परीक्षा दिली. मागील परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या ५ विद्यार्थ्यांनी  परीक्षा दिली. शासकीय आश्रमशाळा ताडगाव या परीक्षा केंद्रावर १९७  विद्यार्थ्यांचा समावेश होता. यापैकी १७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. २ अनुत्तीर्ण विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तालुक्यात परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-01


Related Photos