महत्वाच्या बातम्या

 मनपा व योग नृत्य परिवारातर्फे ३ दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम


- आंतरराष्ट्रीय योग दिवस करणार साजरा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्याने योगाचा प्रचार प्रसार करण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिका आयुष्मान भारत आरोग्य वर्धिनी केंद्र व योगनृत्य परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ३ दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मनपा इमारत वाहनतळ येथे १९ जून ते २१ जून या कालावधीत करण्यात आले आहे.  

आंतरराष्ट्रीय योग दिन हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. योगाचे महत्व अनन्यसाधारण आहे. दररोज योग केल्याने तुमच्या शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. शरीर आणि मन शांत करण्यासाठी योगा खूप फायदेशीर मानला जातो. योग केल्याने तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते. स्नायूंची ताकद वाढते. तसेच यामुळे तुमची श्वसन, ऊर्जा आणि चैतन्य सुधारते.यंदा मनपाद्वारेही पुढाकार घेऊन योग दिन साजरा करण्यात येत आहे  

या ३ दिवसीय कार्यक्रमांमध्ये भारतीय सांस्कृतीक नाटिका,सिंगल इव्हेंट्स,स्पीच, तबला वादन,हॅपी स्ट्रीट,नृत्य,खेळ योग नृत्य, हास्य योग, करोडपती योगा, रिदमिक योगा, पथनाट्य इत्यादी विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत. सदर कार्यक्रमात मनपा अधिकारी कर्मचारी व योग नृत्य परिवाराच्या सर्व सदस्यांचा सहभाग असणार आहे.      

योगाचा प्रचार प्रसार करण्यासाठी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत मनपा, पतंजली योग समिती व योगनृत्य परिवाराद्वारे २२ जानेवारी पासुन चंद्रपूर शहरात विविध ठिकाणी योग शिबिरे घेतली जात आहेत. या शिबिरांचा अनेक नागरीकांनी लाभ झाला आहे. निरोगी व स्वास्थ्य आरोग्य ठेवण्यासाठी सकारात्मक विचार, व्यसनमुक्ती, रोग प्रतिकारात्मक शक्ती वाढविण्यासाठी ही योग प्राणायाम शिबिरांची मदत झाली असुन याद्वारे योगचा प्रचार प्रसार होण्यास मदत मिळुन असुन शहरातील नागरीकांचे स्वास्थ्य निरोगी राखण्याचे कार्य केले जात आहे.

या ३ दिवसीय कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात नागरीकांनी सहभागी होऊन प्रोत्साहन देण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिका व आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.  





  Print






News - Chandrapur




Related Photos