महत्वाच्या बातम्या

 सिंगनपल्लीवासीय व्यसनाला हद्दपार करणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील अतिदुर्गम गाव सिंगनपल्ली येथे सघन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेजारील गावातील अवैध दारूविक्री व वाढते व्यसनाचे प्रमाण कमी करण्यावर चर्चा करण्यात आली.

सिंगनपल्ली येथे अवैध दारूविक्री बंद होती परंतु, शेजारी गावात आणि शेतात चोरून विक्री सुरू असल्याने सदर गावातील व्यसनी लोकांचे प्रमाण वाढत होते. ही समस्या सघन बैठकीच्या माध्यमातून ग्रामस्थांनी मांडली. सोबतच ग्राम पंचायत समिती व इतर समिती सदस्यांच्या उपस्थितीत गावविकास, पेसा कायदा, दारू दुष्परिणाम सत्र घेण्यात आले. दुसऱ्या दिवशी किशोरवयीन मुली, माता आरोग्य शिक्षण आणि व्यसन उपचार शिबिराचे नियोजन करण्यात आले. दारू सोडण्याची इच्छा असलेल्या रुग्णांनी व्यसन उपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले. 

याप्रसंगी बैठकीमध्ये पोलिस पाटील अशोक कन्नाके, अंगणवाडी सेविका जरणा कविराज, आशावर्कर अर्चना गावडे, गाव संघटन महिला, मुक्तिपथ तालुका संघटक आनंद इंगळे आणि स्पार्क कार्यकर्ती सोनी सहारे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos